26 / 11 : हुतात्मा स्मारकात 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली



ब्युरो टीम :  26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवान व पोलीसांना लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, घर घर लंगर सेवा आणि मराठी पत्रकार परिषदच्या वतीने हुतात्मा स्मारकात पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन श्रध्दांजली वाहण्यात आली.

या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष धनंजय भंडारे, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख, पत्रकारांच्या अधिस्विकृती समिती नाशिक विभागाचे सदस्य विजयसिंह होलम, डॉ. संजय असनानी, कैलाश नवलानी, पै. नाना डोंगरे, सुनिल छाजेड, प्रशांत मुनोत, दिलीप कुलकर्णी, आशा पालवे, गौरी दुमाने, संदीप कुलकर्णी, अलकनंदा पालवे आदी उपस्थित होते.

26-11 च्या दहशतवादी हल्ल्यात स्वतःची व कुटुंबाची परवा न करता पोलीस अधिकारी, कर्मचारी व जवानांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बलिदान दिले. शहिदांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मृतींना उजाळा देऊन, अभिवादन करण्यात आले.

हुतात्मा स्मारकावर उपस्थितांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन 26-11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी भारत माता की जय..., वंदे मातरम...च्या दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने