ब्युरो टीम : 'भाजपचे जे बंडखोर उमेदवार आहेत अशा पदाधिकाऱ्यांना निवडणूक संचालन समितीने अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत अर्ज मागे न घेणाऱ्यांच्या विरोधात पक्षाकडून कारवाई केली जाईल,' अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
'महायुतीमध्ये बहुतांश बंडखोरांची समजूत काढण्यात यश आले आहे. एका मतदारसंघातून एक व्यक्तीच उमेदवारी अर्ज भरू शकतो. भाजपचे जे नाराज उमेदवार आहेत ते सगळे आपले अर्ज मागे घेतील असा विश्वास आहे. एखाद दोन ठिकाणी अडचण होऊ शकते. मात्र, पक्षाच्या विरोधात जाऊ नका, अशी विनंती महायुतीच्या बंडखोरांना आम्ही केली आहे. त्यानंतरही अर्ज मागे घेतले नाही तर कारवाई केली जाईल व पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद होतील,' असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा