ब्युरो टीम : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यामध्ये मोठी घडामोड घडली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले आदेश जारी केले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलंय.
Acting on the complaints from INC and other parties, Election Commission of India orders transfer of Rashmi Shukla, DGP Maharashtra with immediate effect with directions to Chief Secretary to hand over her charge to the next senior most IPS officer in the cadre. The Chief… pic.twitter.com/DqocropZo0
— ANI (@ANI) November 4, 2024
रश्मी शुक्लांच्या बदली आदेशांनंतर आता नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या आदेशांनुसार, तीन वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचं पॅनल गठित करून त्यांच्याकडे नव्या नावाबाबतचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे पॅनल आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल. त्यानंतर हा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला जाणार असून त्यानंतर नव्या पोलीस महासंचालकांच्या नावाची घोषणा केली जाईल. आज संध्याकाळपर्यंत ही घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा