Bromodosis: 'या' घरगुती उपायांनी पायांना येणारा घाणेरडा वास करा दूर



ब्युरो टीम : पायांना वास येणं ही एक सामान्य समस्या आहे. तळपायांना जास्त घाम येणं किंवा एकच सॉक्स वारंवार वापरल्यामळे पायांना घाण वास येतो. याने इम्प्रेशन देखील खराब होतं. वैद्यकीय भाषेत पायातून येणाऱ्या दुर्गंधीला ब्रोमोडोसिस म्हणतात. ही समस्या दूर होण्यासाठी थोडीसी काळजी घेतल्यास नक्कीच फायदा होतो. चला तर, आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत, जे ब्रोमोडोसिस समस्येपासून तुमची सुटका करण्यास मदत करतील. 

ब्रोमोडोसिसची मुख्य लक्षणे

- पायांना भेगा पडणे, किंवा कट (इजा) जाणे.

- तुमच्या बोटांच्या दरम्यान असणारे पांढरे ठिपके, ज्यांना खाज येते.

- क्रॅक झालेली त्वचा, ज्यातून रक्तस्त्राव होऊ शकतो.

- तुमच्या पायांच्या तळव्यावर छोटछोटे खड्डे किंवा छिद्र असलेली पांढरी दिसणारी त्वचा.

असा करा उपाय

पायांची दुर्गंधीवर घरच्याघऱी सहज उपचार करता येऊ शकतात, असं डॉक्टरांचं मत आहे. चला तर, हे उपाय नेमके कोणते आहेत, ते जाणून घेऊ.

पाय कोरडे ठेवा

उन्हाळ्यात तुमचे पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवणे महत्त्वाचे आहे. पायाचा ओलेपणा किंवा घामापासून सुटका होण्यासाठी तुम्ही तुमच्या पायाला टॅल्कम पावडर लावू शकता. शूज घालण्यापूर्वी अँटीपर्स्पिरंट वापरून पहा. तसेच, ज्या क्षणी तुम्ही घरी पोहोचाल, तुमचे शूज आणि सॉक्स काढा. शक्य असल्यास, हवा वाहती राहण्यासाठी सँडल वापरा.

घाम शोषणाऱ्या सॉक्सची निवड

तुम्हाला जर उन्हाळ्यात शूज आणि सॉक्स घालायचे असतील, तर तळपायाला आलेला घाम शोषणारे सॉक्स निवडा. कापसासारख्या नैसर्गिक तंतू पासून बनवलेले म्हणजेच सुती सॉक्स घातल्याची खात्री करा.

अँटीबॅक्टेरियल साबण

बॅक्टेरियाची वाढ कमी करण्यासाठी आणि तुमचे पाय स्वच्छ ठेवण्यासाठी, अँटीफंगल किंवा अँटीबॅक्टेरियल साबण वापरा.

शूजबाबत घ्या काळजी

जर तुम्ही चामड्याचे शूज परिधान करत असाल, तर ते दररोज उन्हात किंवा मोकळ्या हवेत ठेवल्याची खात्री करा. सलग दोन दिवस एकच शूज घालणं टाळा. तसेच आठवड्यातून किमान एकदा तरी शूज आतून धुवा.

पायांची काळजी घ्या

पायाची कडक, मृत त्वचा काढून टाका व मॉइश्चरायझ करा. पाय ओला झाल्यानंतर कडक त्वचा ओलसर आणि मऊ होते, अशी जागा बॅक्टेरियांना राहण्यास आवडते.

पाय भिजवा

जर तुमच्या पायाची दुर्गंधी येत असेल, तर तुमचे पाय स्वच्छ करण्यासाठी त्यांना भिजवून ठेवा. एक बादली कोमट पाण्यात, एक कप खडे मिठ व  काही सफरचंद सायडर व्हिनेगर सह मिसळा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाय 20 मिनिटांपर्यंत भिजवा. डॉक्टरांच्या मते, खडे मीठ तुमच्या त्वचेतील ओलावा काढून टाकण्यास मदत करते. ज्यामुळे ती कोरडी होते, व त्यामधील बॅक्टेरिया देखील निघतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने