Chandrakant patil : कोथरूडच्या सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास, चंद्रकांतदादा पाटील यनव्हे वक्तव्य


ब्युरो टीम : कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असून, गेल्या पाच वर्षांपासून कोथरुड हे कुटुंब मानून कार्यरत आहे, भविष्यातही कोथरुडसाठी समर्पित होऊन काम करणार; असल्याची भावना चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना वाढते जनसमर्थन मिळत आहे. 

भाजपा कोथरूड दक्षिण मंडळाच्या वतीने आज प्रभाग क्रमांक १० मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील सहभागी झाले होते.

कोथरूड मधील किनारा हॉटेल चौक येथून रॉलीचा शुभारंभ झाला. परमहंसनगर, टेकडी पायथा, कस्तुरी हॉटेल चौक, पौड रोड, कोथरूड पोलीस स्टेशन, श्रीराम कॉलनी, आशिष गार्डन, कुमार परिसर, सागर कॉलनी, कैलास वसाहत, साईनाथ वसाहत, पीएमसी कॉलनी, अरमान सोसायटी, भिमाले टॉवर्स, सिद्धिविनायक गणेश मंदिर येथे रॉलीचा समारोप झाला. 

रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून लोक हात उंचावून पाठिंबा दर्शवीत होते. फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी यांसह अनेक ठिकाणी महिला औक्षण करण्यासाठी पुढं येत होत्या. विशेष म्हणजे तरुणांचा जल्लोष आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. 

यावेळी भाजप दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष शिंदे, रिपाइंचे ॲड. मंदार जोशी,  नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक, बाळासाहेब टेमकर, वैभव मुरकुटे, गणेश वर्पे, कैलास मोहोळ, बाळासाहेब खंकाळ, राजेश गायकवाड, सिताराम खाडे यांच्या सह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने