devendra fadnavis mohan bhagwat meeting : सरसंघचालक - फडणवीस यांच्या भेटीत नेमकं काय घडलं?



ब्युरो टीम : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा घडवून आणणारी एक मोठी घडामोडी घडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. या भेटीमध्ये महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली.

बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदानाची धामधूम आटोपल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी साडेसहा वाजता संघ मुख्यालयात पोहचले. त्यांनी 

सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. जवळपास १५ मिनिटे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते संघ कार्यालयातून बाहेर निघाले.आता या भेटीमागे नेमकं काय कारण होतं,यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.  मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भेटीत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी संघ स्वयंसेवकांनी राज्यभर केलेले प्रयत्न यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती  मिळतेय. तसेच आगामी काळात राज्यांमध्ये कशा पद्धतीने राजकीय घडामोडी होऊ शकतात? यावरही चर्चा झाल्याचे समजते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने