ब्युरो टीम : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ केली गेली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना सुरक्षा वाढवल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे. अशातच यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फडणवीसांच्या सुरक्षेवरून मोठा सवाल उपस्थित केलाय. ते म्हणाले,'आम्हाला समजायला हवं की त्यांना कोणापासून धोका आहे. लिबिया, युक्रेन, नॉर्थ कोरिया, किम जोंग उनपासून धोका आहे का, आम्हाला चिंता वाटते कारण ते आमचे मित्र आहेत.'
आज राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले,'गृहमंत्री दुसऱ्यांना सुरक्षा देतात पण हे स्वत ला सुरक्षा देत आहेत. देवेंद्र फडणवीस कोणाला घाबरले आहेत? असा सवाल राऊतांनी केला आहे.
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्नभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडी घडताना दिसत आहेत. उमेदवारी अर्ज भरलेल्यांना तो माघारी घेण्यासाठी उद्या शेवटची तारीख आहे. त्याआधी महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते बंडखोरांची नाराजी दूर करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावत आहेत. दुसरीकडे राऊत यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आहे.
टिप्पणी पोस्ट करा