ब्युरो टीम : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि कॅनडातून येणाऱ्या वस्तूंवर शुल्क लागू करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर अतिरिक्त १० टक्के शुल्क लादण्याचे आश्वासन दिले असून २० जानेवारी रोजी व्हाईट हाऊसमध्ये पहिल्या दिवशी कॅनडा आणि मेक्सिकोवरील टॅरिफसह अनेक आदेशांकवर स्वाक्षरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प म्हणाले की, “मेक्सिको आणि कॅनडामधून हजारो लोक अमेरिकेत येत आहेत जे सर्वांना माहीत आहे. येथे येऊन गुन्हेगारी आणि ड्रग्ज अशा पातळीपर्यंत नेत आहेत ज्या यापूर्वी कधीही न पाहिलेल्या आहेत. मी मेक्सिको आणि कॅनडामधून यूएसमध्ये येणाऱ्या सर्व उत्पादनांवर २५% शुल्क लागू करेन.”
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून जानेवारीमध्ये शपथ घेतील.
टिप्पणी पोस्ट करा