ब्युरो टीम : विधानसभा निवडणुका पारदर्शक व निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक नियोजन करावे, असे आवाहन निवडणूक निरीक्षक अरुणकुमार यांनी केले.
नेवासा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आयोजित समन्वयक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अरूण उंडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय बिरादार, पोलीस उपअधीक्षक सुनिल पाटील आदी उपस्थित होते.
श्री.अरुणकुमार म्हणाले, निवडणूकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी -कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून कामकाज करावे. निवडणूक कामात टाळाटाळ व दिरंगाई करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी अरुणकुमार यांनी आचारसंहिता, कायदा- सुव्यवस्था, एक खिडकी, मिडिया, मनुष्यबळ व्यवस्थापन, मतदान केंद्रांवरील सोयी-सुविधा, प्रशिक्षण, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व स्ट्रॉंग रूम, टपाली मतपत्रिका, खर्च व्यवस्थापन, वाहतूक आराखडा, अशा विविध कक्षांना भेट देत या कक्षांतील समन्वयक अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
टिप्पणी पोस्ट करा