ब्युरो टीम : संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकारी - कर्मचाऱ्यांचे ईव्हीएम मशीन हाताळणी, मतदानासाठी यंत्र तयार करणे व मतमोजणी बाबतचे प्रशिक्षण घेण्यात आले.
संगमनेर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झालेल्या या प्रशिक्षणास निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज मांजरे, संतोष कोरे उपस्थित होते. प्रशिक्षणात विभाग प्रमुख व सहाय्यक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनच्या सिलिंग व सेटिंग, मतमोजणी प्रक्रिया, फेऱ्यानुसार व टेबलनुसार साहित्य हाताळणी, तसेच साहित्य वितरणाच्या पद्धतींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान ईव्हीएम यंत्राची तयारी व सील बंद प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही घेण्यात आले. प्रशिक्षणामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेत आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास मदत मिळाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.हिंगे यांनी सांगितले
टिप्पणी पोस्ट करा