ब्युरो टीम : चांगल्या आरोग्यासाठी दररोज किमान सात ताप झोप घ्यावी, असं आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. जर तुम्ही दररोज किमान सात तास झोप घेत नसाल, तर तुमच्या आरोग्याच्यादृष्टिनं ते धोकादायक आहे.
आजच्या व्यस्त जीवनात अनेकांना पुरेशी झोप घेण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. खरतर पुरेशी झोप घेणं शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. पुरेशी झोप घेतल्यानं मनाला शांती मिळते, पचनक्रिया व्यवस्थित राहते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. तर, झोपेच्या कमतरतेमुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. कोणत्याही व्यक्तीनं किमान 7 ते 9 तासांची झोप घ्यावी, असं आरोग्य तज्ज्ञ अनेकदा सांगतात. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं मानलं जातं. चला तर, तुम्ही 7 तासांपेक्षा कमी झोप घेतल्यावर तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात, ते जाणून घेऊ.
वजन वाढते
झोप आणि वजन यांचा जवळचा संबंध आहे. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील ग्रेलिन आणि लेप्टिन या दोन हार्मोन्सचं संतुलन बिघडते. ग्रेलिन हार्मोन भूक उत्तेजित करते, तर लेप्टिन हार्मोन पोट भरल्याचं संकेत देते. जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा ग्रेलिन हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागते. यासोबतच लेप्टिन हार्मोनची पातळीही कमी होऊ लागते, ज्यामुळे तुम्हाला खाल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटत नाही. हार्मोन्सचे हे असंतुलन विशेषतः सायंकाळच्या वेळी जास्त होते. त्यामुळे वजन वाढू लागते
थकवा
जेव्हा तुम्ही सात तासांपेक्षा कमी झोपता, तेव्हा तुमच्या शरीराकडे वेगवेगळ्या स्लीप सायकलमधून जाण्यासाठी कमी वेळ असतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. हा थकवा दिवसभर कायम राहू शकतो, ज्याचा एकाग्रता तसेच तुम्ही करत असलेल्या दिवसभरातील कामांवर नकारात्मक परिणाम होतो. पुरेशी झोप न मिळाल्याचा तुमच्या विचार आणि निर्णय क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो.
हृदयविकाराचा धोका
जेव्हा एखादी व्यक्ती झोपते, तेव्हा ती वेळी संबंधित व्यक्तीच्या शरीराची अंतर्गत दुरुस्ती आणि साफसफाईची असते. परंतु झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील विषारी पदार्थ साफ होत नाहीत, व त्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो.
टिप्पणी पोस्ट करा