Krishna Das Prabhu : हिंदू नेते कृष्ण दास प्रभू यांना बांगलादेशात अटक, भारताने व्यक्त केली चिंता



ब्युरो टीम : बांगलादेशात हिंदू नेते कृष्ण दास प्रभू यांना अटक  करण्यात आली आहे. त्यानंतर भारताने कृष्ण दास प्रभू यांच्या बांगलादेशातील अटकेवर गहिरी चिंता व्यक्त केली आहे. तसंच त्यांना जामीन न मिळणंही योग्य नाही असंही भारताने म्हटलं आहे.

चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना कृष्ण प्रभू दास प्रभू  या नावानेही ओळखलं जातं. बांगलादेशात त्यांनी काही रॅलींचं आयोजन केलं होतं. भक्तांविरोधात होणाऱ्या अन्यायाचा त्यांनी निषेध नोंदवला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. ढाका पोलिसांचे प्रवक्ते तालेबुर रहमान यांनी सांगितलं की कृष्ण दास प्रभू यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कुठले आरोप आहेत हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. दरम्यान भारताने या अटकेबाबत गहिरी चिंता व्यक्त केली आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली चिंता

कृष्ण दास प्रभू यांच्या अटकेबाबत आणि त्यांना जामीन नाकारला गेल्याने आम्ही चिंतेत आहोत. या प्रकरणाची गंभीर दखल भारताने घेतली आहे. बांगलादेशातील अतिरेकी घटकांकडून हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यानंतर ही पहिलीच घटना आहे. अल्पसंख्य हिंदूंची घरं जाळणं, त्यांच्या व्यावसायिक आस्थापना, कार्यालयं यांची जाळपोळ करणं, लूटमार, तोडफोड या घटना घडल्या आहेत. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. शांततापूर्ण मेळाव्यांतून आपलं मत मांडणाऱ्या आणि हिंदूंच्या सुरक्षेची मागणी करणाऱ्या दास यांना यांना अटक करणं आणि जामीन नाकारणं ही बाबत दुर्दैवी आहे असंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने