ब्युरो टीम : विधानसभा निवडणुकीचं मतदान २० नोव्हेंबरला संपले आहे. निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. मतदान संपल्यानंतर अनेक एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत देखील चर्चा सुरू झाली आहे. परंतु एक्झिट पोल पाहता, महाराष्ट्रमध्ये भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत यंदा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चांगली चुरस पाहण्यास मिळाली. निवडणुकीनंतर आलेले एक्झिट पोल मध्येही ही चुरस कायम दिसत आहे. परंतु महाराष्ट्रात भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरेल, हे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच महायुतीला राज्यात सर्वात जास्त जागा येण्याची शक्यता ही बहुतांश एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.
महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्यामुळे यंदा महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी भाजपचा नेता विराजमान होण्याची शक्यता जास्त आहे.
भाजपने अद्याप मुख्यमंत्री पदाचे नाव निश्चित केले नसले, तरी लवकरच केंद्रीय नेतृत्वाकडून त्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
संघाची भूमिका राहणार महत्वाची
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यादृष्टीने मतदान झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस व सर संघचालक मोहन भागवत यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात असून ती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा