Maharashtra Vidhansabha Nivadnuk 2024 : महायुती की ‘मविआ’? ‘मराठी प्रिंट’वर पहा महानिकालाचे Live अपडेट्स

ब्युरो टीम :  राज्याची विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आली आहे. निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवारी (२३ नोव्हेंबर) सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यंदा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कोणाला होणार हे पहावे लागणार आहे.

राज्यात कोणाचे सरकार येणार, याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडी किंवा महायुतीला बहुमत मिळणार, हे देखील मततमोजणी नंतर स्पष्ट होईल. 

महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान दोन्ही बाजूने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानसभा निकालाआधी सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची बैठक बोलवल्याचे समजते आहे. भाजपचे अनेक मोठे नेते या बैठकीला हजर होते. तर महाविकास आघाडीचे देखील बैठकीचे सत्र सुरू आहे. 

महाराष्ट्र निवडणूक निकालाच्या अनुषंगाने marathiprint.com ने विशेष तयारी केली आहे. 23 नोव्हेंबरला निकालांचे सर्व अपडेट्स आणि मतमोजणीचे सर्व अपडेट्स तुम्ही मराठी प्रिंटची www.marathiprint.com या वेबसाईटवर तसेच आमच्या @Marathi_print या एक्स प्लॅटफॉर्मवर (पूर्वीचे ट्विटर) जाणून घेऊ शकता.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने