ब्युरो टीम: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच यासंबंधी मोठी बातमी आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम आणि दलित समाजासोबत विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याची घोषणा केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज वापस घेण्याच्या दिवशी सकाळपर्यंत उमेदवार देण्याबाबत मित्र पक्षांची यादी आली नसल्याने आपण कोणत्याच मतदारसंघात उमेदवार देणार नसल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे एका जातीवर लढणे शक्य नसल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, मागच्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. 288 जागांवर निवडूक लढण्याची तयारी जरांगे पाटील यांनी केली असल्याची चर्चाही होती. काल, रविवारी जरांगे पाटील 13- 14 जागांवर उमेदवार देणार असल्याचं वृत्तही आलं होतं. पण त्यातच आज, सोमवारी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली असून तसं त्यांनी जाहीर केलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा