ब्युरो टीम : राज्यामध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न हा राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? असाच आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुख्यमंत्री पदाचा निर्णय एक दोन दिवसांत येणं अपेक्षित आहे. तो निर्णय झाला की मंत्रीपदाचं वाटप होईल. यंदाच्या मंत्री मंडळात अहिल्यानगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून आमदार संग्राम जगताप यांचे स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. खात्रीलायक सूत्रांकडून याबाबत माहिती मिळाली आहे.
#अहिल्यानगर #अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यमंत्री पद देण्याचे जवळपास निश्चित झालं आहे.
— मराठी Print (@Marathi_print) November 27, 2024
संग्राम जगताप यांना मंत्रिपद देण्यासाठी पुढील मुद्दयावर विचार झाल्याची माहिती आहे:
- नगर शहरात १९९५ पासून…
संग्राम जगताप हे अहिल्यानगर जिल्ह्यातील अहमदनगर शहर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहे. त्यामुळे त्यांचा मंत्री पदावर दाव आहे. यासोबत जगताप यांना मंत्रीपद देण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस इतरही महत्त्वाचे निकष लावू शकते. त्यामध्ये अहमदनगर शहराला १९९५ नंतर आतापर्यंत एकदाही मंत्रीपद मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जवळपास ३० वर्षांनी अहमदनगर शहरात मंत्रीपद दिले जाऊ शकते. याशिवाय जगताप यांना मंत्री करण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान आणखी मजबूत करणे हे आहे.
सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके हे नगर दक्षिणचे खासदार तर कर्जत-जामखेडमध्ये आमदार रोहीत पवार आहेत. लंके आणि रोहित पवार यांच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्यात उभारी घेणार नाही, याची जबाबदारी जगताप समर्थपणे पेलू शकतात. तसेच आगामी काळात अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जगताप यांचे मंत्रीपद उपयुक्त ठरू शकते. त्यामुळेच आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा