ब्युरो टीम : पारलिंगी नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागृतीकरीता व्हावी यासाठी समाज कल्याण सहायक आयुक्त तसेच कायदेशीर सल्ला आणि संशोधन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भिडेवाडा ते शनिवारवाडा दरम्यान मतदार जनजागृती रॅली काढून सर्वांसारखेच आपणही देशाचे नागरिक असल्याने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा, असा संदेश देण्यात आला.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, कायदेशीर सल्ला आणि संशोधन केंद्राचे राज्य व्यवस्थापक आनंद बाकडे, शासकीय वसतिगृहाचे गृहप्रमुख नंदकुमार राणे, जयश्री मोहळे, गृहपाल रमेश कोरे, गणपत कळसकर, राहूल तांगडे, सुक्षाला शेलार, कर्मचारी शुभम पगारे, ज्योती शेळके, प्रसाद जंगम, कृष्णा कांबळे आदींसह वसतिगृहातील विद्यार्थी, नागरिक आणि पारलिंगी नागरिक उपस्थित होते.
पारलिंगी व्यक्तींना मतदार कार्डाच्या महत्त्वाविषयी श्री. लोंढे यांनी यावेळी माहिती दिली. पारलिंगी व्यक्तीदेखील देशाचे नागरिक असून मतदान प्रक्रियेत त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. या लोकशाहीच्या उत्सवात पारलिंगी व्यक्तींसह प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. देशाचे सुजाण नागरिक म्हणून मतदान करुन आपली जबाबदारी पार पाडून पारलिंगी व्यक्तींनी परिचयाच्या पारलिंगी व्यक्तींना विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
श्रीमती पाटील आणि श्री. बाकडे यांनीही यावेळी मतदानाचा हक्क बजावण्याबाबत आवाहन केले.
टिप्पणी पोस्ट करा