ब्युरो टीम : फिल्म इंडस्ट्रीमध्ये एखाद्या अभिनेत्याला ठसा उमटवणं इतकं सोपं नाही. सुरुवातीच्या काळात प्रत्येक अभिनेत्याला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. दक्षिणेतील 52 वर्षीय अशीच एक अभिनेत्री आहे, जिच्याकडे आज इंडस्ट्रीमधील अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. पण एक काळ असा होता की, या अभिनेत्रीचे चित्रपट सतत फ्लॉप होत होते. मात्र, त्यानंतर तिने स्वतःच्या प्रतिभेची अशी काही जादू फिल्म इंडस्ट्रीमध्ये पसरवली की तिचं नाव आता सर्वत्र पोहोचलं आहे. चला तर या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊ...
सुंदर डोळ्यांच्या या अभिनेत्रीच्या करिअरमध्ये एक काळ असा होता, जेव्हा तिला हिंदी चित्रपटांमध्ये ओळख मिळत नव्हती. तिचे तमिळ चित्रपटही यशस्वी होत नव्हते. तिचे चित्रपट सतत फ्लॉप होत होते. एक वेळ तर अशी आली की, या अभिनेत्रीवर ‘फ्लॉप अभिनेत्री’ म्हणून टॅग लावण्यात आला. या अभिनेत्रीचे नाव आहे रम्या कृष्णन.
1985 मध्ये प्रसिद्ध झाला होता पहिला चित्रपट
रम्या कृष्णन यांचा जन्म 15 सप्टेंबर 1970 रोजी मद्रासमध्ये झाला. त्यांनी पहिल्यांदा ‘नेरम पुलारुंबोल’ या चित्रपटात काम केलं होतं. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर झाला. त्यापूर्वीच त्यांचा ‘वेल्लई मनसु’ हा चित्रपट 1985 मध्ये प्रदर्शित झाला होता. रम्या यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘सुरुवातीला माझे चित्रपट तामिळ आणि तेलुगू या दोन्ही भाषांमध्ये सतत फ्लॉप होत होते. मी चांगली कलाकार नाही, असं मला वाटू लागलं. मी माझ्या अभिनय कारकिर्दीत फार काळ यशस्वी होऊ शकले नव्हते. तो काळ माझ्यासाठी खूप त्रासदायक होता. माझ्या चित्रपटांच्या अपयशामुळे माझ्या आईलाही त्रास झाला होता. एकदा माझा एक चित्रपट पाहिल्यानंतर आईनं विचारलं होतं, ‘तू कशी जगणार?’ आई ही माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम आहे.’ 1989 मध्ये रम्या यांचा ‘सूत्रधारुलु’ हा चित्रपट आला, व या चित्रपटानं त्यांना एक नवीन ओळख दिली.
बाहुबली चित्रपटात केलं काम
'खलनायक'मध्ये अभिनेता संजय दत्त यांच्यासोबत दिसलेल्या रम्या कृष्णन आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव झालं आहे. एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली' चित्रपटात त्यांनी 'शिवागामी देवी' या व्यक्तिरेखेमध्ये इतका जीव फुंकला होता की आजही प्रेक्षकांना ते पात्र आठवते. या चित्रपटानं जगभरात 1800 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. रम्याकडे आता सर्व इंडस्ट्रीमधून सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या ऑफर आहेत.
टिप्पणी पोस्ट करा