ब्युरो टीम : थंडीचा महिना सुरू झाल्यानंतर आरोग्याला फायदा व्हावा, या उद्देशाने अनेक लोक स्वतःच्या आहारात विविध पदार्थांचा समावेश करीत असतात. हिवाळ्यात रताळ्याचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होईल. रताळ्यामध्ये असलेली पोषक तत्वे पचनासोबतच त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ते खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वाढेल आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होईल. हिवाळ्यात रताळ्याचे सेवन केल्याने काय फायदे होतात, ते पाहुयात
- रताळ्याचे सेवन त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण जास्त असते, जे अँटिऑक्सिडंट असतात.
-व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी रताळे हा चांगला स्रोत आहे. हिवाळ्यात व्हिटॅमिन डी समृद्ध रताळे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. रूट भाज्यांमध्ये उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे रताळे खाणे सर्वात फायदेशीर आहे.
- हिवाळ्यात रताळे खाल्ल्याने तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 आढळते. हे मेटाबॉलिज्म आणि मज्जासंस्था यांना व्यवस्थित ठेवते. रताळ्यामध्ये भरपूर फायबर असते आणि ते पचनासाठी चांगले असतात.
- रताळे हा मधुमेहावर पारंपारिक उपाय आहे. त्यात कार्बोहायड्रेट आणि हार्मोन अॅडिपोनेक्टिन असतात. त्यांच्या मिश्रणामुळे रक्तातील साखर स्थिर राहते.
- रताळ्यामध्ये असलेल्या बीटा कॅरोटीनमुळे स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे महिलांची प्रजनन क्षमता सुधारते.
- रताळ्याचे सेवन मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रताळ्यामध्ये असलेले कोलीन मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असते आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मॅंगनीज आवश्यक असते.
- रताळ्यामध्ये असलेले फायबरचे प्रमाण खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. जर तुम्हाला रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर रताळ्याचे सेवन केल्याने तुम्हाला फायदा होईल. यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
हिवाळ्यामध्ये लोक निरोगी राहण्यासाठी स्वतःच्या आहारात अनेक बदल करीत असतात. तुम्ही हिवाळ्यात रताळ्यांचा आहारात समावेश केल्यास त्याचा चांगलाच फायदा तुम्हाला होईल.
टिप्पणी पोस्ट करा