vivek phansalkar : पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवला



ब्युरो टीम : केंद्रिय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिले होते. शुक्ला यांची बदली केल्यावर मुंबई पोलीस आयुक्त असलेल्या विवेक फणसळकर यांच्याकडे राज्य पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

विवेक फणसळकर हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलिस आयुक्तपदी निवड होण्याआधी महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे संचालक होते. तर २०१६-१८ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. दहशतवाद विरोधी पथकाचेही ते प्रमुख होते. पुण्याचे असलेल्या फणसळकर यांची अकोला येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून पहिली नेमणूक झाली होती 'कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये दक्षता विभागाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. नाशिक पोलीस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी वर्धा आणि परभणीत अधिक्षक पद भूषविले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने