Water chestnut :हिवाळ्यात खा शिंगाडा, होतील 'हे' फायदे



ब्युरो टीम : शिंगाडा  हे असे फळ  आहे, जे हिवाळ्यात खूप आवडीने खाल्ले जाते. हे फळ खाण्यास चविष्ट तर आहेच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे फळ कच्चे किंवा उकडून खाल्ले जाते. शरीराला अनेक गंभीर आजारांपासून हे फळ वाचवते. वेबएमडीच्या वृत्तानुसार, शिंगाडा फळ खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. तसेच, ते रक्तदाब नियंत्रणात ठेवते, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. चला जाणून घेऊया हिवाळ्यात शिंगाडा फळ खाण्याचे काय फायदे आहेत.

कमी कॅलरीज आणि भरपूर पोषक

शिंगाडा फळ शरीरासाठी भरपूर पोषक असते. तसेच त्यात खूप कमी कॅलरीज असतात. यात प्रथिने, पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे, व्हिटॅमिन बी 6 आणि रिबोफ्लेविन भरपूर प्रमाणात असते. यामध्ये आढळणारे फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. या फळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे कॅलरीज कमी असतात. पोटाच्या विविध समस्या दूर होण्यास या फळाचे सेवन फायदेशीर ठरते.

अँटी-ऑक्सिडंट चे प्रमाण जास्त

शिंगाड्यामध्ये  भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे शरीराला फ्री रॅडिकल्स सारख्या हानिकारक मॉलिक्यूल पासून वाचवतात. फ्री रॅडिकल्स शरीरात जमा झाल्यास शरीर नैसर्गिकरित्या सुरक्षित राहत नाही, आणि यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढतो. त्यामुळे जुनाट आजार, हृदयविकार, टाईप २ मधुमेह आणि विविध प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता वाढते. शिंगाड्यामध्ये  प्रामुख्याने फेरुलिक अॅसिड, गॅलोकेटचिन गॅलेट, एपिकेटचिन गॅलेट आणि कॅटेचिन गॅलेट, असे विविध अँटी-ऑक्सिडंट असतात, ते शरीर निरोगी ठेवतात

हृदय निरोगी राहते

रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढल्याने स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. शिंगाड्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असून ते खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच पोटॅशियम हृदयविकाराचा धोका कमी करते. शिंगाडा खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास मदत

शिंगाडा हे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरी कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी हे फळ खाणे फायद्याचे ठरते. शिंगाडा खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. जर तुम्हाला खूप वेळा भूक लागत असेल, तर तुमच्या कार्बोहायड्रेट पदार्थांऐवजी शिंगाडा खा. यामुळे तुमचे वाढलेले वजन सहज नियंत्रणात येऊ शकते.

तणाव कमी होतो

शिंगाडा खाल्याने तणाव दूर होतो, आणि शरीरातील थकवाही दूर होतो. जर तुम्हाला अशक्तपणा आल्यासारखे वाटत असेल आणि शरीर थकल्यासारखे वाटत असेल, तर तुम्ही शिंगाड्याचे सेवन करा. यामुळे तणाव कमी होण्यास देखील मदत होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने