विक्रम बनकर (अहिल्यानगर) : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यानंतर राज्यभर भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत असून अहिल्यानगर येथेही भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.
भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे #अहिल्यानगर येथे भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला#DevendraFadnavis4Maha #DevendraFadanvis #देवेंद्र_फडणवीस #DevendraFadnavisForCM… pic.twitter.com/oBW7QOl5sJ
— मराठी Print (@Marathi_print) December 4, 2024
आज भाजपची विधीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव सूचित केले. चंद्रकांत पाटील यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांनीही फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण देणार प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यानंतर फडणवीस यांचे नाव गटनेता म्हणून निश्चित झाले. त्यामुळे आता उद्या नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. उद्या, गुरुवारी (५ डिसेंबर) आझाद मैदानावर सायंकाळी पाच वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. मात्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित होताच राज्यभर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला आहे.
अहिल्यानगर येथेही भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवत आनंद व्यक्त करीत विजयी रॅली काढली.
टिप्पणी पोस्ट करा