Ahilyanagar : कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, चार जण ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल जप्त


ब्युरो टीम : अहिल्यानगर येथील झेंडीगेट परिसरात असणाऱ्या कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत  4 आरोपींना ताब्यात घेत 9,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. रविवारी (8 डिसेंबर 2024) पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अल्तमश अब्दुल कुरेशी (वय 25, रा.व्यापारी मोहल्ला, रा.झेंडीगेट, अहिल्यानगर), इरफान सय्यद मोहम्मद हनीफ (वय 30, रा.कोठला, झेंडीगेट, अहिल्यानगर), अरकान असीफ कुरेशी (वय 23, रा.व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहिल्यानगर), अश्रफ शौकत खान ( वय 26, रा.झेंडीगेट, अहिल्यानगर) असे आहे. तर, आरोपी फैजान इद्रीस कुरेशी,  सुफियान उर्फ कल्लु इद्रीस कुरेशी व शोएब अब्दुल रऊफ कुरेशी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून पंचासमक्ष 3,26,000 रुपये किंमतीचे 1630 किलो वजनाचे गोमांस, 1,00,000 रुपये किंमतीच्या 5 गायी, 2,000 रुपये किंमतीचे एक वासरू, लोखंडी सत्तुर व 5,00,000 रुपयांचा एमएच-16-सीसी-9410 अशोक लेलंड कंपनीचे वाहन असा एकुण 9,28,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पुढील तपास कोतवाली ठाण्याचे पोलीस करीत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने