Ajit Pawar :अजित दादा दिल्लीत तळ ठोकून, आज शहांना भेटणार



ब्युरो टीम : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गेल्या २४ तासांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीत आलेत. काही वेळातच त्यांची शहांसोबत भेट होऊ शकेल. अजित पवारांसोबत पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील दिल्लीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीच्या नव्या सरकारमध्ये ११ मंत्रिपदं मिळावीत, अशी अजित पवारांची मागणी आहे. याशिवाय राष्ट्रवादीला केंद्रात १ कॅबिनेट मंत्रिपद हवं आहे. ही मागणी मान्य झाल्यास प्रफुल पटेल केंद्रात मंत्री होतील. याशिवाय अजित पवार राज्यपालपदासाठीही आग्रही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला १ राज्यपालपद द्यावं, अशी त्यांची मागणी आहे. या सगळ्या मागण्या घेऊन ते अमित शहांना भेटणार आहेत. 

शहा आणि पवार यांची भेट नेमकी केव्हा होणार? तसेच या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील आगामी राजकारणाच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरू शकते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने