ब्युरो टीम : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आज, गुरुवारी (५ डिसेंबर) अजित आशाताई अनंतराव पवार यांना शपथ घेतली. अजित पवार यांचा परिचय जाणून घेऊ
श्री. अजित अनंतराव पवार
जन्म : २२ जुलै १९५९
जन्म ठिकाण : देवळाली प्रवरा, तालुका - राहुरी, जिल्हा - अहमदनगर.
शिक्षण : बी.कॉम.
ज्ञातभाषा :मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुनेत्रा.
अपत्ये :एकूण २ (दोन मुलगे).
व्यवसाय : शेती.
पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
मतदारसंघ : २०१ - बारामती, जिल्हा-पुणे,
इतर माहिती :
विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा; संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, तालुका इंदापूर; संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि. भवानीनगर; संचालक, माळेगाव सहकारी साखर कारखाना, लि. संचालक, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि. जिल्हा पुणे, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई, संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे; मार्च १९९१ ते ऑगस्ट १९९१ तसेच डिसेंबर १९९४ ते डिसेंबर १९९८ अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; ११ डिसेंबर १९९८ ते १७ ऑक्टोबर १९९९ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई; १९ डिसेंबर २००५ पासून संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ; संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई; २८ सप्टेंबर २००६ पासून अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, मार्च २०१३ पासून अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, सप्टेंबर २००५ ते २३ मार्च, २०१३ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, १३ ऑगस्ट २००६ ते १९ ऑगस्ट २०१८ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन;
१७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ सदस्य, लोकसभा १९९१-९५ (पो.नि.), १९९५-९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४- २०१९, २०१९-२०२४ सदस्य, महाराष्ट्र विधान सभा; २८ जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२ कृषी, फलोत्पादन व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर, १९९२ ते फेब्रुवारी, १९९३ जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचे राज्यमंत्री; २७ ऑक्टोबर १९९९ ते २५ डिसेंबर २००३ पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन खात्याचे मंत्री; २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर २००४ ग्रामविकास, पाणी पुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे) खात्याचे मंत्री; ९ नोव्हेंबर २००४ ते ७ नोव्हेंबर २००९ जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री; ७ नोव्हेंबर, २००९ ते ९ नोव्हेंबर २०१० जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) व ऊर्जा खात्याचे मंत्री; ११ नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१४ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन आणि ऊर्जा); २२ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०१९ उपमुख्यमंत्री, डिसेंबर २०१९ – जून २०२२ उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन), काहीकाळ राज्य उत्पादन शुल्क या खात्याचा अतिरिक्त कार्यभार.
जुलै 2023 मध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, खाती – वित्त व नियोजन
नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ.
(संदर्भ - १४वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)
टिप्पणी पोस्ट करा