ब्युरो टीम : महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार याबाबतचा निर्णय निश्चित झालाय. १३२ आमदारांची संख्या असलेल्या भाजपला मंत्रिमंडळातील निम्मी अर्थात २२ मंत्रिपदे मिळणार आहेत. त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदे मिळणार असल्याचेही समजते.
महायुतीला एक हाती सत्ता मिळाली असून भाजपने सर्वांधिक अर्थात १३२ जागा जिंकल्या आहेत. त्या खालोखाल शिंदे यांच्या शिवसेनेने ५७, तर त्या खालोखाल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या तिन्ही पक्षात मंत्रिपदांच्या तसेच खात्यांच्या वाटपाची चर्चा सुरू असून आता या चर्चेला अंतिम स्वरुप मिळाल्याचे समजते. मंत्रिपदाच्या संख्येवर शिक्कामोर्तब करण्याचे काम भाजपच्या दिल्लीतील शीर्षस्थ नेतृत्वाकडून होणार आहे.
महायुतीमधील घटकपक्षांना प्रत्येकी सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रिपद देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा