ब्युरो टीम : विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर आज, गुरुवारी (५ डिसेंबर) तब्बल १२ दिवसांनी महायुती सत्तास्थापन करणार आहे. आझाद मैदानात जंगी शपथविधी सोहळ्याचे नियोजन करण्यात आलं आहे.
आज सायंकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी होईल. मुख्यमंत्र्यांसह २० ते २२ मंत्र्यांचा पहिल्या टप्प्यात शपथविधी होईल असं सांगितलं जात होतं. मात्र, तुर्तास इतर आमदार व नेत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण आज केवळ तिघांचाच शपथविधी होईल, असं भाजपाने स्पष्ट केलं आहे.
'आज मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होईल. त्यांच्याबरोबर दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी पार पडेल,' अशी माहिती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 'हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल,' असंही त्यांनी सांगितलं.
टिप्पणी पोस्ट करा