ब्युरो टीम : भाजपने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास निश्चित केलं आहे. भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव विधीमंडळ गटनेता म्हणून निश्चित झालं आहे. त्यामुळे उद्या, गुरुवारी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील.
भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव विधीमंडळ गटनेता म्हणून निश्चित झालं आहे. त्यामुळे गुरुवारी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील.#MaharashtraCM #DevendraFadanvis
— मराठी Print (@Marathi_print) December 4, 2024
भाजपची कोर कमिटीची बैठक संपली आहे. निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीला काहीच क्षणांमध्ये सुरुवात होणार आहे. याच बैठकीत गटनेता म्हणून फडणवीसांची निवड होईल.
भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू
— मराठी Print (@Marathi_print) December 4, 2024
यावेळी गटनेता पदी कुणाची वर्णी लागणार काही क्षणात जाहीर होणार आहे
भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीचे सूत्रसंचालन रणधीर सावरकर करणार आहेत.
भाजपच्या गटनेत्याचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील मांडतील.
तर आशिष शेलार आणि रविंद्र…
विधीमंडळ नेत्यांच्या बैठकीत गटनेता पदी फडणवीस यांची निवड जाहीर केली जाईल. भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीचे सूत्रसंचालन रणधीर सावरकर करणार आहेत. भाजपच्या गटनेत्याचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील मांडतील. तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण देणार प्रस्तावाला अनुमोदन देणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा