ब्युरो टीम : भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे. आता गुरुवारी (५ डिसेंबर २०२४) रोजी सायंकाळी पाच वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. २०१४ साली निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी पहिल्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २०१९ ला अजित पवारांसोबत भल्या पहाटे त्यांनी घेतलेली शपथ बरीच चर्चेत आली होती. त्यावेळी ते अवघे तीन दिवस मुख्यमंत्री पदावर होते त्यानंतर आता उद्या नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
उद्या, ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
— मराठी Print (@Marathi_print) December 4, 2024
२०१४ साली निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी पहिल्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
२०१९ ला अजित पवारांसोबत त्यांनी शपथ घेतली होती. त्यावेळी ते अवघे तीन दिवस मुख्यमंत्री होते
आता उद्या…
आज भाजपची विधीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव सूचित केले. चंद्रकांत पाटील यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांनीही फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण देणार प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यानंतर फडणवीस यांचे नाव गटनेता म्हणून निश्चित झाले. त्यामुळे आता उद्या नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा