ब्युरो टीम : शपथविधीली अवघे काही तास शिल्लक असताना उपमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. आजच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार शपथ ग्रहण करतील. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रिपदावरुन जे नाराजीनाट्य सुरु होतं, त्यावर अखेर पूर्णविराम लागला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नांनंतर एकनाथ शिंदे हे आजच्या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास तयार झाले असल्याची माहिती आहे. फडणवीसांनी शिंदेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. अखेर एकनाथ शिंदे हे आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसह शपथ ग्रहण करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हे तीनही नेते शपथ घेणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा