ब्युरो टीम : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही,' अशी माहिती माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे.
राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने या योजनेबाबत लोकांमध्ये पसरलेले संभ्रम देूर करणारं एक पत्रक जारी केलं असून ते पत्रक देखील तटकरे यांनी शेअर केलं आहे.
तटकरे यांनी पोस्टमध्ये पुढे म्हंटले आहे की,'एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून यावर मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाजमाध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती.'
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास… pic.twitter.com/mtOnnIAWNo
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) December 11, 2024
महिला व बालकल्याण विभागाच्या पत्रकात नेमकं काय?
महिला व बालकल्याण विभागाने जारी केलेल्या परीपत्रकात म्हटलं आहे की 'सर्वांना कळविण्यात येते की राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या असे निर्दशनास आलेले आहे की, मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमांवर रील्स व व्हिडीओंद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे. या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तींमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल. तसेच महिला व बालकल्याण विभागाने वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना सुचवलं आहे की त्यांनी लोकांधील संभ्रम दूर करावा. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपलेस्तरावरुन तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी.'
टिप्पणी पोस्ट करा