ब्युरो टीम : माजी सैनिकांच्या पेन्शन ईसीएचएस, सीएसडी कँटीन, स्पर्श याबाबतच्या अडी-अडचणींचे निराकरण करण्यासाठी २२ डिसेंबर, २०२४ रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहिल्यानगर यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील युद्ध विधवा, वीरमाता,वीरपिता, माजी सैनिक विधवा व माजी सैनिकांनी त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी अर्जाच्या दोन प्रती व सर्व सैन्य कागदपत्रांसमवेत आर्मड पोलो ग्राऊंड, अहिल्यानगर येथे उपस्थित रहावे, असेही कळविण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा