Optical Illusions : तुम्ही स्वतःला बुद्धिमान समजता? मग बेडरुममध्ये लपलेला कुत्रा शोधून दाखवा



ब्युरो टीम :  सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्युजनचे विविध फोटो  आजकाल व्हायरल होतात. या ऑप्टिकल इल्युजनमधली विशिष्ट वस्तू, प्राणी काही सेकंदांत ओळखण्याचं आव्हान नेटिझन्सला दिलं जातं. तुम्हीही अनेकदा असे आव्हान स्वीकारलं असेल. आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक ऑप्टिकल इल्युजन घेऊन आलो आहोत. यामध्ये फोटोमध्ये लपलेला कुत्रा शोधण्याचं आव्हान देण्यात आलायं. हा फोटो एका बेडरुमचा आहे. या फोटोतील कुत्रा शोधण्यासाठी तुम्हाला केवळ तीक्ष्ण नजरच नाही, तर तीक्ष्ण बुद्धी सुद्धा असणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे ऑप्टिकल इल्युजनचं सोडवण्यास यशस्वी झालात, तर तुम्हीही बुद्धिमान लोकांच्या यादीत सामील होताल.

बुद्धिमान असाल, तर उत्तर द्या

या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे यात कुत्रा अजिबात दिसत नाही. बेडच्या आजूबाजूला अनेक वस्तू पडल्याचे फोटोमध्ये दिसते. बेडवरील बेडशीट व उशीही अस्ताव्यस्त दिसते. या सगळ्यात कुत्रा सहजासहजी दिसत नाही. जर तुम्हाला हा कुत्रा सापडला, तर तुम्हाला बुद्धिमान नक्कीच म्हटलं जाईल.

खरतर लोकांच्या विचारसरणीला आव्हान देणारा आणि निरीक्षण कौशल्याची चाचणी घेणारा ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो आहे. ऑप्टिकल इल्युजनची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही आहे की, यूजर्सचे लक्ष कमी कालावधीसाठी गुंतवून ठेवते, आणि मनासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. त्याच पद्धतीचा हा फोटो असून यामध्ये घराची बेडरूम दिसत आहे, व त्यात एक कुत्रा शोधायचा आहे.


कुठे आहे कुत्रा?

फोटोमध्ये हा कुत्रा बेडवर बसला आहे. जर तुम्ही नीट पाहिलं, तर चादरीच्या पुढच्या भागाच्या मध्यभागी कुत्र्याच्या चेहऱ्याचा थोडासा भाग बाहेर आलेला दिसतोय. हा कुत्रा तिथेच झोपलेला असल्याचे दिसते. फोटोमध्ये कुत्रा अशा पद्धतीनं आहे की तो सहजासहजी दिसत नाही. परंतु काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर कुत्रा कुठे आहे, हे कळते.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने