Optical Illusions:फोटोतील साप शोधताना तुमच्या डोक्याला येईल ताप


ब्युरो टीम : आजकाल सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्युजनचे विविध फोटो, पेटिंग व्हायरल होतात. या ऑप्टिकल इल्युजनमधली विशिष्ट गोष्ट काही सेकंदांत ओळखण्याचं आव्हान नेटिझन्सला दिलं जातं. त्यामध्ये कधी एखादी वस्तू दडलेली असते, तर कधी एखादा प्राणी. अवघ्या काही सेकंदात ती वस्तू, प्राणी शोधण्याचं आव्हान दिलं जातं. आतापर्यंत अशी अनेक चित्रं किंवा फोटो नेटिझन्ससाठी आव्हान ठरली आहेत. नुकताच सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला असून  या ऑप्टिकल इल्युजनमध्ये लपलेला साप 17  सेकंदात शोधण्याचं आव्हान देण्यात आलायं. अनेकांनी हे आव्हान स्वीकारून फोटोत दडलेल्या सापाला शोधण्याचा प्रयत्न केला. हे काम करताना मात्र अनेकांचं डोकं बंद पडण्याची वेळ आली, मात्र उत्तर काही मिळालं नाही.

बर्‍याच लोकांनी सांगितलं की, ‘हा ऑप्टिकल इल्युजन खूप कठीण आहे, आणि यातील साप शोधण्यात अपयश येते.’ पण काही लोकांना या फोटोतील साप शोधण्यात यश आलंय. आपणही या ऑप्टिकल इल्युजनचं चित्र काळजीपूर्वक पहा, आणि त्यात साप दिसतोय का, हे शोधा. तो शोधण्यासाठी तुम्हाला केवळ तीक्ष्ण नजरच नाही, तर तीक्ष्ण बुद्धी सुद्धा असणं गरजेचं आहे. तुम्हीही हे ऑप्टिकल इल्युजनचं सोडवण्यास यशस्वी झालात, तर तुम्हीही बुद्धिमान लोकांच्या यादीत सामील झाला आहात.


कुठं लपलाय साप?

जर तुम्हालाही या फोटोमध्ये लपलेला साप दिसत नसेल, तर काळजी करु नका, आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देत आहोत. या फोटोमध्ये एका कोपऱ्यात दोन उंच झाडं शेजारीशेजारी असून त्यामधील एका झाडाच्या सर्वात वरच्या टोकावर जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला तेथे साप दिसेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने