pushpa 2 : आणि ‘ते’ शब्द ऐकून अल्लू अर्जुनच्या डोळ्यात आले अश्रू



ब्युरो टीम : ‘पुष्पा २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपट पुढील काही तासांत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अशातच सोशल मीडियावर सुकुमारचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत दिसत आहे की, 'प्रमोशनच्या कार्यक्रमात सुकुमार अल्लू अर्जुनचे कौतुक करतात. कौतुकात ते अल्लू अर्जुनसाठी असे शब्द वापरतात की अल्लू अर्जुन भावूक होतो. 


अल्लू अर्जुनबाबत सुकुमार नेमकं काय म्हणाले?

'अल्लू अर्जुनबरोबर सिनेविश्वातील माझा प्रवास ‘आर्या’पासून सुरू झाला. मी गेल्या काही वर्षांत त्याला फार जास्त मेहनत घेताना आणि पुढे जाताना पाहिलं आहे. मी त्याचा संघर्ष फार जवळून पाहिला आहे. आज ‘पुष्पा’ जे काही आहे, त्याचं कारण माझं अल्लू अर्जुनवर असलेलं प्रेम आहे. तो छोट्या-छोट्या गोष्टींच्या मागे लागतो आणि त्या सोडवतो. अल्लू अर्जन माझ्यासाठी एक ऊर्जा आहे आणि हा चित्रपट मी त्याच्यासाठीच बनवला आहे. चित्रपटसृष्टी माझं जग आहे आणि हे जग मोठं करण्यासाठी कोणी आपल्या संपूर्ण आयुष्यातील वेळ घालवत असेल तर ही फार मोठी गोष्ट आहे,' असं सुकुमार म्हणाले. त्याच्या याच विधानाने अल्लू अर्जुनच्या डोळ्यात अश्रू तरळले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने