ब्युरो टीम : बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर फिरकीपटू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. इतकंच काय तर दोन सामन्यांसाठी टीमसोबत न थांबताच आर अश्विन घरी परतला आहे. आर अश्विन याचं घरी जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी एअरपोर्टवर पत्रकारांनी त्याला गराडा घातला. तसेच प्रश्नांचा भडिमार केला. मात्र त्याने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. पण जेव्हा घरी पोहोचला तेव्हा मात्र त्याने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली. क्रिकेटमधील आतापर्यंतचा प्रवास, कर्णधारपद न मिळाल्याचं दु:ख, आयपीएल खेळणार की नाही असे एक ना अनेक प्रश्न त्याला विचारण्यात आले. या सर्व प्रश्नांची त्याने सडेतोडपणे उत्तरं दिली. भारतीय संघाचं नेतृत्व करायला न मिळाल्याचं दु:ख आहे का? तेव्हा अश्विन म्हणाला की, आता या बाबत बोलण्यात काहीच अर्थ नाही. आता हा विषय संपला आहे. पण याबाबत मला काहीच पश्चाताप नाही. मी दुरून पश्चाताप झालेल्या अनेकांना पाहिलं आहे. पण मला असं आयुष्य जगायचं नाही.
अचानक निवृत्ती घेण्याबाबत काही निराशा आहे का? त्यावर आर अश्विनने सांगितलं की, असं काहीच घडलं नाही. तसेच त्याने या बातम्यांचं खंडन केलं आहे. मी हसत आहे, मी आनंदी असल्याचं तुम्ही पाहू शकता. त्यानंतर त्याला आयपीएल 2025 स्पर्धेत खेळणार की नाही असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अश्विनने सांगितलं की, ‘मी चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणार आहे आणि मी अधिक काळ खेळण्याची इच्छा ठेवली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. अश्विनचं क्रिकेट पूर्ण झालं असं मला वाटत नाही. अश्विनने भारतीय क्रिकेटर म्हणून फक्त कार्यकाळ पूर्ण केला आहे. बस एवढंच सांगू इच्छितो.’
आर अश्विनने भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये एका उंचीवर नेऊन ठेवण्यात मदत केली आहे. 106 कसोटी सामन्यात त्याने 537 विकेट घेतल्या आहेत. भारतासाठी 500 हून अधिक बळी घेणारा दुसरा गोलंदा आहे. इतकंच भारताने 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकला होता. या संघात आर अश्विन होता. दरम्यान, आयपीएल मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने आर अश्विनला रिलीज केलं होतं. त्यानंतर 9.25 कोटींची बोली लावून चेन्नईने आपल्या संघात घेतलं आहे. 2015 नंतर आर अश्विन चेन्नई सुपर किंग्समध्ये परतला आहे.
टिप्पणी पोस्ट करा