sangamner crime : चैन स्नॅचिंग करणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद



ब्युरो टीम : संगमनेर शहरामध्ये चैन स्नॅचिंग (जबरी चोरी) करणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे. आरोपीकडून संगमनेर शहरामधील 8 व लोणी येथील 1 असे एकुण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत.

संगमनेर येथे रस्त्याने पायी जात असताना प्रियंका सतीष चौधरी, (रा.मालपाणी हेल्थक्लब, संगमनेर) यांच्या गळयातील सोन्याचे मिनीगंठण  अज्ञात आरोपी पल्सर मोटार सायकलवरून पाठीमागुन येऊन जबरीने हिसकावून घेतले. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी हो घटना घडली. याप्रकरणी प्रिंयका चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संगमनेर शहरामध्ये सातत्याने चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडत असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते. नमुद आदेशान्वये  आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई तुषार धाकराव, पोलीस अंमलदार मनोज गोसावी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, संतोष खैरे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रमीजराजा अत्तार, रोहित येमुल, सागर ससाणे, जालींदर माने, रविंद्र घुंगासे, मेघराज कोल्हे, भाग्यश्री भिटे, चंद्रकांत कुसळकर व अरूण मोरे अशांचे पथक नेमुन चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आवश्यक सूचना देवुन पथकास रवाना केले. 

तपास पथक घटनाठिकाणी भेट देवुन, चैन स्नॅचिंग घडलेल्या ठिकाणचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज, तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा निष्पन्न करून, निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा मयुर संजय ब्राम्हणे (रा.वेताळबाबा चौक, लोणी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर) याने त्याचे साथीदारासह केला असून, ते सध्या भाने वस्ती, हसनापूर रोड, लोणी येथे आहेत.पथकाने मिळालेल्या बातमीतील ठिकाणी जाऊन संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मयुर संजय ब्राम्हणे (वय 22, रा.चर्चजवळ, वेताळबाबा चौक, लोणी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर ), निखील सुरेश भुजवळ ( वय 20, रा.गिरीम, ता.दौंड, जि.पुणे हल्ली रा.भाने वस्ती, हसनापूर रोड, लोणी, ता.राहाता), दिप भटु सातपुते (वय 22, रा.रणछोजडजी सोसायटी, कतारग्राम, सुरत, गुजरात हल्ली रा.भाने वस्ती, हसनापूर रोड, लोणी, ता.राहाता) अभिषेक बाळासाहेब जाधव (वय 22, रा.बाभळेश्वर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर) असे सांगितले. पथकाने ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन विचारपुस करता ताब्यातील आरोपींनी त्याचे साथीदार संदीप पोपट कदम (रा.मानोरी, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर) व  बल्ली उर्फ बलीराम रामचंद्र यादव ( रा.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर) याचे मदतीने पल्सर व युनिकॉर्न मोटार सायकलवरून संगमनेर शहर व लोणी येथे चैन स्नॅचींगचे गुन्हे केल्याचे सांगितले.तसेच गुन्हयांमध्ये चोरी केलेले सोन्याचे दागीने हे लोणी येथील सोनारास विक्री केल्याची माहिती दिलेली आहे.  पथकाने ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीवरून संगमनेर शहर व लोणी पोलीस स्टेशनला दाखल जबरी चोरीच्या ( चैन स्नॅचिंग ) गुन्हयांची पडताळणी करून  8 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.  आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी संगमनेर शहर व लोणी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने