विक्रम बनकर (अहिल्यानगर) : अहिल्यानगर महानगर पालिकेच्या माध्यमातून सर्व शहरातील शाळा, कॉलेज खाजगी क्लासेस चे फायर ऑडिट करा नितीन भुतारे यांची आयुक्तांकडे मागणी
राज्य सरकार तसेच सर्वोच्च न्यायालयाने सन २००६ तसेच २००९ च्या आदेशानुसार सर्व सरकारी, खाजगी शाळा, कॉलेज, क्लासेस यांच्या इमारती मध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा साधने बसुन घेणे तसेच या सर्व इमारतींचे फायर ऑडिट करून घेणे गरजेचे आहे. परंतु अहिल्या नगर शहरातील जवळपास सर्वच शाळा, कॉलेज खाजगी क्लासेस मध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा साधने दिसत नाही फायर ऑडिट झालेले सुध्दा दिसत नाही. त्यामुळे हजारो, लाखो रुपये फी गोळा करणाऱ्या या शिक्षण संस्था विद्यार्थांच्या सुरक्षे बाबत काळजी घेत नाही. असे या वेळी नितीन भुतारे म्हणाले
तसेच अहमदनगर महानगर पालिका आयुक्त हे देखील या प्रकरणात गांभीर्य दाखवत नाही असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा ही महानगर पालिका तसेच संबंधित शाळा, कॉलेज खाजगी क्लासेस इत्यादी संस्थांची आहे. त्यामुळे आयुक्त साहेब आपण या विषयात लक्ष घालून ताबडतोप विद्यार्थी सुरक्षित राहतील या करिता सर्व शहरातील शाळा, कॉलेज, खाजगी क्लासेस चे फायर ऑडिट करून घ्यावे अशी मागणी युवा नेते नितीन भुतारे यांनी केली आहे. या मागील काळात १ एप्रिल २००१८ रोजी या बाबत मी निवेदन देऊन महानगर पालिकेने संबंधित शाळा, कॉलेज खाजगी क्लासेस यांना फक्त नोटीस बजावण्याचे काम केले पण आग प्रतिबंधक यंत्रणा, साधने बसविण्यात आली नाही कुठेही संस्थेचे फायर ऑडिट झाले नाही.
आग लागल्यावर महानगर पालिका प्रशासन जागे होते व नंतर या सर्व प्रक्रिया पार पाडतात त्यामुळे मी आपणास आधीच मागणी करत आहे. त्यामुळे आयुक्त साहेब यांनी दखल घ्यावी व सर्व शहरातील शाळा कॉलेज, खाजगी क्लासेस यांच्या इमारतींचे फायर ऑडिट करून घ्यावे अशी विनंती युवा नेते नितीन भुतारे यांनी अहिल्या नगर महानगर पालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.
तसेच आग लागल्याच्या या पुढे काही घटना घडल्या तर त्यास आयुक्त जबाबदार राहतील असा इशारा देखील नितीन भुतारे यांनी महानगर पालिका प्रशासनाला दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा