ब्युरो टीम: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवरुन अजितदादांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा,'असे त्यांनी म्हटलं आहे.
आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. pic.twitter.com/6SnkF97upb
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 12, 2024
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा ८५ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पवारांवर विविध स्तरातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षात होत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनीही शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ते आपल्या अन्य सहकाऱ्यांसह दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी गेले. अजितदादासोबत खासदार सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, आमदार छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी नेते यावेळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा