ब्युरो टीम : दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज, गुरुवारी (12 डिसेंबर 2024) राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी शरद पवार यांची सहकुटुंब आणि पक्षाच्या नेत्यांसह भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आता अमित शाह हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. आज वाढदिवस असल्यामुळे ही भेट झाली असावी, असा अंदाज काढला जात आहे. मात्र या भेटी मागे एखादा राजकीय हेतू तर नाही ना? यादृष्टीने ही चर्चा सुरू झाली आहे. त्यातच भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'जर शरद पवार महायुतीत येत असतील तर त्याचा आम्हाला आनंदच होईल.' त्यामुळे आता स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी शरद पवार मोठे राजकीय खळबळ उडून देणारा निर्णय घेणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा