Sharad Pawar : ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार - स्वागताध्यक्ष शरद पवार

ब्युरो टीम : यंदा होणारे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्ली येथे पार पडणार आहे.  या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी नुकतीच संमेलनाची पाहणी केली. याची सविस्तर माहिती देण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक महत्वाची घोषणा केली.  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उभे राहणार आहेत. संमेलन होणाऱ्या ठिकाणाला छत्रपती शिवाजी महाराज नगरी नाव देण्यात आले आहे. तर संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली. 

शरद पवारांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची रुपरेषा कशी असणार याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रासह दिल्लीतील ५ हजार साहित्य प्रेमी उपस्थित राहणार आहेत. तर २५०० प्रतिनिधी महाराष्ट्रातून येणार आहेत, अशी माहिती शरद पवारांनी दिली.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केलं. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करणार आहोत. मुख्य सभागृह त्याचं नामकरण केलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह असं नाव दिलं. लोकमान्य टिळक आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने प्रवेशद्वार राहणार असेल. या साहित्य संमेलनाला दिल्ली आणि महाराष्ट्रातील ५ हजार साहित्य प्रेमी उपस्थित राहतील. त्याशिवाय २५०० प्रतिनिधी महाराष्ट्रातून येणार आहे. १५०० लोकांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रंथ दिंडी निघणार आहे”, असे शरद पवार म्हणाले.

पंतप्रधान मोदी संमेलनास येण्यास उत्सुक 


“पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही आधीच निमंत्रण दिलं. त्यांच्या सचिवांचा फोन आला. वेळ कळवणार आहेत. सकाळी की दुपारी येणार हे सांगतील. त्यांना एक विनंती केली की, पंतप्रधानांचं निश्चित झालं तर आम्ही विद्या भवनात कार्यक्रम घेऊ. एक दोन दिवसात आम्हाला याबाबतची माहिती मिळेल. मोदींची कार्यक्रमाला यायची इच्छा आहे. सकाळीच हवी का? दुपारी आलेलं चालेल का? असा प्रश्न मोदींनी विचारला. त्यामुळे ते येणार असं आम्ही गृहित धरलं आहे. मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांची संमती आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोललो नाही. त्यांना निमंत्रण देणार आहोत”, असेही शरद पवारांनी सांगितले.

साहित्य संमेलनाचा संबंध नाही

“पाकिस्तानातील मराठी भाषिकांनी साहित्य संमेलनाला यायची इच्छा व्यक्त केली आहे. पण हा प्रश्न सोपा नाही. परराष्ट्र मंत्रालयाशी बोलावं लागेल. सरकारचं कन्फर्मेशन मिळेल की नाही हे सांगू शकत नाही. साहित्य संमेलनाचा संबंध नाही. पण जगातील कित्येक संघटनाचा अध्यक्ष होतो. माझ्या अनेक बैठका रावळपिंडी आणि कराचीत बैठका व्हायच्या. कराचीत मुंबईतील लोक भेटायचे. १०० लोकांची महाराष्ट्र मंडळ नावाची संस्था आहे. कराचीत आहे. विशाल राजपूत हे मुख्य आहेत. सिंध प्रांतात एक हजार लोक राहतात”, असेही शरद पवारांनी म्हटले.

“अजून वक्त वाढतील. मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या नंतरचं हे दिल्लीतील पहिलं संमेलन आहे. शरद पवार यांचा साहित्याशी आधीपासूनचा संबंध आहे. त्यामुळे ते स्वागत अध्यक्ष होतील”, असेही शरद पवार म्हणाले


 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने