ब्युरो टीम : शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी जोरदार टीका केली आहे. 'बाळासाहेबांनी हिंदुत्वाची जी दिशा दाखवली, ती सोडल्यावर उद्धव ठाकरेंनी आपली काय दशा झाली ते पहावे. आता दारोदार फिरताय,' असे महाजन म्हणाले आहेत. ते 'टीव्ही 9 मराठी'शी बोलत होते.
'उद्धव ठाकरे यांना आता हिंदुत्व आठवले. पण एकदा जाऊन श्रावणी करा आणि मग हिंदुत्वाचं नाव घ्या. दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले आहे, त्यासाठी तुम्हाला श्रावणी हेच प्रायश्चित आहे. त्यामुळे आमची दिशा आणि दशा बघू नका आम्ही खंबीर आहोत. राज ठाकरे खंबीर आहे हे सगळं पाहायला,'असेही महाजन म्हणाले.
दरम्यान, राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खूप मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. तर, शिवसेना फुटल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जोरदार कामगिरी करत ९ जागा जिंकल्या होत्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७ जागा मिळाल्या होत्या. पण, विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी दमदार पुनरागमन करत ५७ जागांवर विजय मिळवला. तर, उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला अवघ्या २० जागा आल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा