Sukhbir Singh Badal : सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार! व्हिडिओ आला समोर



ब्युरो टीम : पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून या गोळीबाराच्या घटनेनंतर उपस्थित लोकांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय. दरम्यान, या हल्ल्यात सुखबीर सिंग बादल हे अगदी थोडक्यात बचावले आहेत.


व्हिडिओमध्ये नेमकं काय?

व्हिडीओमध्ये निळ्या रंगाचा सेवादरांचा पेशाख घातलेले बादल त्यांच्या व्हील चेअरवर बसललेले दिसत आहेत. सोमवारी (२ डिसेंबर) बादल यांना ‘अकाल तख्त’कडून धार्मिक शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे पाय फ्रॅक्चर असलले बादल हे व्हील चेअरवर बसून सुवर्ण मंदिराबाहेर सेवा देत होते. दरम्यान या घटनेबद्दल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव नारायण सिंग चौरा असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकले नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने