ब्युरो टीम : जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेल्या ताजमहालला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. पर्यटन विभागाच्या मेलवर ताजमहाल बॉम्बने उडवून देण्याचा आशय असलेला मेल आला आहे. या मेलनंतर सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. हा बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी नेमकी कुणी दिली? हा ई-मेल नक्की कुणी पाठवला? याचा तपास सुरू आहे.
Uttar Pradesh | Taj Mahal in Agra received a bomb threat via email today
— ANI (@ANI) December 3, 2024
ACP Taj Security Syed Areeb Ahmed says, "Tourism department received the email. Based on that, a case is being registered at Tajganj police station. Further investigation is being done..."
(Pics: ACP Taj… pic.twitter.com/1lw3E34dOM
पर्यटन विभागाच्या अधिकृत मेलवर ताजमहाल संदर्भात एक मेल आला. त्या मेलमध्ये ताजमहालात बॉम्बस्फोट घडवून आणू आणि नष्ट करू, अशी धमकी देण्यात आली आहे. शिवाय ताजमहालच्या आत बॉम्ब ठेवण्यात आल्याचाही उल्लेख त्या मेलमध्ये करण्यात आला आहे. हे रोखायचं असेल तर रोखून दाखवा, असं थेट आव्हानही या मेलमधून देण्यात आलं आहे.
या मेलमध्ये बॉम्बस्फोट नेमका कधी घडवून आणला जाईल? यांची वेळ देखील देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये बॉम्बस्फोटाची वेळ सकाळी नऊ वाजता निश्चित करण्यात आली आहे. हा मेल वाचताच पर्यटन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळवले. नंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचली. यासह स्थानिक पोलिस, सीआयएसएफ आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील ही माहिती देण्यात आली.
ताजमहालच्या बाहेरील आणि आतील भागात सीआयएसएफने सखोल तपासणी सुरू केली आहे. यासाठी विशेष श्वानपथक आणि बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा