ब्युरो टीम : नवीन वर्ष २०२५ सुरू झाले आहे. हे नवीन वर्ष सुख, समृद्धीनं भरलेलं असावं, यासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी वेगवेगळे उपाय केले जातात. कोणी देवाला जातं, तर कोणी घरामध्ये पूजापाठ करतात. आज आम्ही तुम्हाला ज्योतिषशास्त्रात सांगितलेले असे काही उपाय सांगणार आहोत, जे नववर्षाच्या पहिल्या दिवशी केल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो.
नवीन वर्ष २०२५ आनंदाची भेट घेऊन यावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. देवी लक्ष्मीची स्वतःवर आणि कुटुंबावर वर्षभर कृपा राहावी, नवीन वर्षात प्रगती व्हावी, असे प्रत्येकाला वाटते. ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत, जे केल्यास नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंददायी असू शकते, अशी मान्यता आहे. चला तर ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय कोणते आहेत, ते जाणून घेऊया.
सूर्याची करा उपासना
ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य दिल्याने माणसाचे सर्व रोग आणि गरिबीही दूर होते. खरतरं रोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं. पण तसं करणं शक्य नसेल, तर वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्याला सकाळी लवकर उठून अर्घ्य द्या. त्यामुळे तुमच्यावर ग्रहांचा शुभ प्रभाव पडतो, असं मानलं जातं.
श्री हनुमान पूजा करा
वर्षाच्या पहिल्या दिवशी संकट दूर करणाऱ्या भगवान श्री हनुमानाची पूजा करणं अत्यंत शुभ आणि लाभदायक मानलं जातं. या दिवशी हनुमान पूजा करून त्यांच्या मूर्तीला वस्त्र अर्पण करा. असं केल्यानं श्री हनुमान प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात, असं मानलं जातं.
घरी श्री यंत्राची स्थापना करा
ज्योतिषशास्त्रानुसार धन, कीर्ती आणि सौभाग्य हवं असेल, तर घरी श्री यंत्राची स्थापना करा, आणि त्याची रोज पूजा करा. पूजेसाठी दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा, त्यानंतर श्री यंत्राला गंगाजलाने स्नान घाला. यासोबत ‘ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम: चा जप करा.
दान करणे आहे शुभ
वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करणं खूप महत्वाच आहे. या दिवशी गरजू किंवा गरीब व्यक्तीला ब्लँकेट किंवा उबदार कपडे दान करणं शुभ मानलं जातं. यासोबतच तांदूळ, दूध इत्यादी दान केल्यानेही शुभ फळ मिळतात. असं केल्यानं घरात सुख-समृद्धी येते, आणि घरातील वातावरणही प्रसन्न राहते.
दरम्यान, अवघ्या काही दिवसांवर नवीन वर्षाचा पहिला दिवस आला आहे. या पहिल्या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेला उपाय केला, तर त्याचा फायदा होऊ शकतो, अशी मान्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा