job & education : सारथीमार्फत दीड हजार तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण




ब्युरो टीम: सारथीमार्फत "सरदार सुर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण" कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील एक हजार ५०० विद्यार्थ्यांना दरवर्षी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानुसार १० जानेवारी पासून नोंदणी सुरु असल्याची माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे  यांनी कळविली आहे.

प्रशिक्षित वाहन चालकांची देशात व देशाबाहेर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. प्रशिक्षित वाहनचालक उपलब्ध करण्यासाठी तरुण-तरुणींना रोजगार व स्वयंरोजगारासाठी संधी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या रस्ता सुरक्षा अंतर्गत उपक्रमांतर्गत असलेल्या आय.डी.टी.आर. पुणे या केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत एका महिन्याचे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे. दररोज आठ तासासाठी हे प्रशिक्षण राहील त्यामध्ये वाहनांचे भाग त्याचे देखभाल व दुरुस्ती तसेच ड्रायव्हिंगचे भारतातील व परदेशातील नियमांची माहिती देण्यात येईल.

दररोज क्षेत्रीय स्तरावर सराव व प्रशिक्षण देण्यात येईल. या विद्यार्थ्यांना एका प्रशिक्षण महिन्यासाठी रुपये १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तसेच परदेशात या माध्यमातून रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. याकरिता जास्तीत जास्त सारथी लक्षीत गटातील उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सारथी संस्थेच्या संकेतस्थळावर http://sarthi- maharashtragov.in.>Notice Board>Skill Development येथे नोंदणी करावी. असे आवाहन श्री. काकडे  यांनी केले आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने