Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला ३० वर्षानंतर आलाय हा दुर्लभ संयोग

 


ब्युरो टीम : जानेवारी महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण मकर संक्रांती म्हणून ओळखला जातो. यंदाच्या मकर संक्रांतीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. तब्बल ३० वर्षानंतर मकर संक्रांतीला दुर्मिळ संयोग घडत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत जाईल. मकर संक्रांतीला शनि देव त्यांच्या मुळ राशीत अर्थात कुंभ राशीत असणार आहे. हा योग तब्बल ३० वर्षानंतर जुळून आला आहे. 

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत जाईल. मकर संक्रांतीला शनि देव त्यांच्या मुळ राशीत अर्थात कुंभ राशीत असणार आहे. हा योग तब्बल ३० वर्षानंतर जुळून आला आहे. त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला मिथुन, तुळ, मकर आणि कुंभ राशीवर सूर्य-शनिची कृपा राहिल.

मिथुन राशीच्या लोकांना या काळात शनिदेवाची कृपा राहिल. शनि भाग्य स्थानात असल्यामुळे हा काळ अनुकूल असेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. 

तुळ राशीच्या व्यक्तींची व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. धातुशी संबंधित काम करणाऱ्यांना फायदा होईल. बांधकाम कार्यात लाभ होऊ शकतो. धार्मिक कार्यात रुची वाढेल. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील.

मकर राशीच्या लोकांना शनिच्या साडेसातीपासून आराम मिळेल. तुमच्या अनेक समस्या दूर होतील. मकर राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळेल. 

कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा तिसरे चरण सुरु राहील. करिअरमधील अडचणी दूर होतील.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने