ब्युरो टीम : मकर संक्रांतीचा सण १४ जानेवारी २०२५ रोजी साजरा होत आहे. मकर संक्रांतीच्या सणाला बाजरीची भाकरी अनेकजण खातात. या भाकरीला तीळही लावलेले असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, बाजाराची भाकरी खाणे हे थंडीच्या महिन्यात खूप फायदेशीर आहे.
हिवाळ्यात जर तुम्ही तुमच्या आहारात बाजरीचा समावेश केला, तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बाजरीची भाकरी खाण्यासोबतच बाजरीचे पिठाचा वापर करून पराठा, खिचडी आणि लाडू यासारखे विविध पदार्थ खाऊन तुम्ही तुमच्या आहारात बाजरीचा सहज समावेश करू शकता. बाजरी ही उष्ण असते, त्याचप्रमाणे कॅल्शियम, मॅंगनीज, फॉस्फरस, फायबर, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स त्यात आढळतात. जे आरोग्याला अनेक फायदे प्रदान करण्यात मदत करतात. त्यामुळेच थंडीच्या दिवसात आहारात बाजरीचा समावेश करणे गरजेचे आहे. आहारात बाजरीचा समावेश केल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
पचनक्रिया चांगली राहते
बाजरीची भाकरी किंवा बाजरीपासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचा आहारात समावेश केल्यास पचनक्रिया चांगली राहते. बाजरीत भरपूर फायबर आढळते. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते.
ब्लड शुगर लेव्हल व्यवस्थित राहते
आहारात बाजरीचा समावेश केल्यास तुमची ब्लड शुगर लेव्हल व्यवस्थित राहते. त्यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांना बाजरीचे पीठ खाण्याचा सल्ला दिला जातो.
पोषण आणि ऊर्जा
बाजरीमध्ये कॅल्शियम, मॅंगनीज, फॉस्फरस, फायबर, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम आणि अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे, आहारात बाजरीचा समावेश केल्याने शरीराचे चांगले पोषण होण्यासोबतच ऊर्जा मिळते.
हाडे मजबूत होतात
बाजरीत भरपूर कॅल्शियम आढळते. जे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते.
शरीराचे तापमान योग्य राहते
आहारात बाजरीचा समावेश केल्याने शरीराला ऊब मिळते. त्यामुळे शरीराचे तापमान योग्य राहण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते.
खराब कोलेस्ट्रॉल कमी करते
बाजरीत नियासिन नावाचे व्हिटॅमिन देखील असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
रक्तदाब नियंत्रित करते
बाजरीत पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
टिप्पणी पोस्ट करा