ब्युरो टीम : इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात होऊन आता जवळपास दोन आठवडे झाले आहेत. या नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रात. मकरसंक्रांत १४ जानेवारी २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. या दरम्यान आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. तसेच, 'तिळगुळ घ्या गोड बोला' असं म्हणतं आपण संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ, तिळाच्या वड्या, लाडू वाटतो. संक्रांतीला तिळाच्या लाडूंचं फार महत्त्व आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, तीळ खाण्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. चला तर, हे फायदे जाणून घेऊयात.
- तिळामध्ये तांबे आणि मॅगनीज मोठ्या प्रमाणात आढळते.
- तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी 1, बी 6 थायामिन फोलेट, नियासिन, मॉलिब्डेनम, सेलेनियम आणि झिंक या सर्व गोष्टी देखील तिळामध्ये असतात.
- तिळाच्या बियांमध्ये सेसमिन आणि सेसमोलिन या दोन गोष्टी असतात.
- तिळ खाल्ल्याने मधुमेही रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.
- तिळामुळे हाडे देखील मजबूत होतात. कर्करोगाचा धोका देखील तीळ खाल्ल्याने कमी होतो.
- तीळ खाल्ल्याने पचनक्रिया देखील चांगली होती. यासारखे अनेक फायदे तीळ खाल्ल्याने होतात.
टीप : वरील सर्व बाबी मराठी प्रिंट केवळ माहिती म्हणून वाचकांपर्येंत पोहोचवत आहे. यातून मराठी प्रिंट कोणताही दावा करत नाही.
टिप्पणी पोस्ट करा