ब्युरो टीम : मकर संक्रांती हा भारतातील महत्वाचा सण आहे. यंदा १४ जानेवारी २०२५ रोजी हा सण साजरा होत आहे. हा सण काही खास पदार्थांसह साजरा केला जातो. चला तर, मकर संक्रांतीला कोणते पदार्थ खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल, ते जाणून घेऊ.
शेंगदाणे
शेंगदाणे शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात. शेंगदाण्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, पोषक आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीराला ऊर्जा देतात. त्यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, नियासिन, रिबोफ्लेविन, थायामिन, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी9 आणि पॅन्टोथेनिक अॅसिड असते. शेंगदाण्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेसह पचनाच्या समस्यांमध्येही आराम मिळतो. तसेच, याचे सेवन महिलांसाठी चांगले मानले जाते. कारण ते प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करते.
गूळ
गूळ हा आरोग्याचा खजिना आहे. हिवाळ्यात त्याचे सेवन शरीराला नैसर्गिक उष्णता देण्यास मदत करते. गुळामध्ये जीवनसत्त्वे, लोह आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. जे योग्य पोषण देण्याबरोबरच रक्ताभिसरणदेखील वाढवतात. हे पचनसंस्थेसाठी देखील चांगले आहे.
तीळ
आहारातील प्रथिने आणि अमिनो अॅसिड तीळामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. जे स्नायू आणि हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तिळामध्ये फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम, बी कॉम्प्लेक्स यासह भरपूर पोषक तत्वे आढळतात. तिळाचे गुळासोबत सेवन करणे आरोग्यदायी मानले जाते.
टीप : वरील सर्व बाबी मराठी प्रिंट केवळ माहिती म्हणून वाचकांपर्येंत पोहोचवत आहे. यातून मराठी प्रिंट कोणताही दावा करत नाही.
टिप्पणी पोस्ट करा